एक्स्प्रेस-वेवर ट्रॉमा केअर सेंटर

By admin | Published: January 3, 2015 01:20 AM2015-01-03T01:20:36+5:302015-01-03T01:20:36+5:30

मुंबई-पुणे या महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरलेला एक्स्पे्रस-वे अर्थात यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या वाढत्या अपघातांमुळे चिंतेचा विषय ठरला आहे़

Express-Waver Trauma Care Center | एक्स्प्रेस-वेवर ट्रॉमा केअर सेंटर

एक्स्प्रेस-वेवर ट्रॉमा केअर सेंटर

Next

नारायण जाधव ल्ल ठाणे
मुंबई-पुणे या महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरलेला एक्स्पे्रस-वे अर्थात यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या वाढत्या अपघातांमुळे चिंतेचा विषय ठरला आहे़ दरवर्षी शेकडो जणांना या महामार्गावर अपघात होत आहेत़ यात झीरो अवरमध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो़ यावर उपाय म्हणून आता या महामार्गावर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरसह अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पुरविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे़
महामार्गालगतच्या ओझर्डे गावानजीक सुमारे आठ एकर जागेवर हे ट्रॉमा केअर सेंटर आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स उतरण्यासाठी हेलिपोर्ट बांधण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे़ येत्या दोन-तीन महिन्यांत तो प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (एमएसआरडीसी) एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली़
बीओटी पद्धतीवर हा प्रकल्प हाती घेतला आहे़ हेलिकॉप्टर अथवा एअर अ‍ॅम्ब्युलन्स उतरण्यासाठी जे हेलिपॅड लागणार आहे, ते बांधण्यासाठी तसेच ट्रॉमा केअर सेंटर बांधण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित दाखल्यांसह इमारत बांधकाम परवानग्या स्वत: विकासकाने घेतल्या आहेत़ हेलिपॅडसह ट्रॉमा सेंटरच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी कोणकोणती वैद्यकीय उपकरणे लागतील, याची पाहणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे पथक लवकरच पाहणी करणार आहे. त्यानंतर ते खुले होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

1या महामार्गावर वर्षाला सव्वादोनशे ते अडीचशे अपघात होत असून, त्यात ७० ते ८० जणांना आपला जीव गमवावा लागत आहे़ या मार्गावर वाहनांच्या वेगाचे ८० किमीचे स्पीड लिमिट असतानाही अनेकांना भरधाव वेगाचा मोह आवरत नसल्याने येथे १०० ते १२५ किमी वेगाने वाहने धावताना दिसतात़

2यामुळेच अपघातांची संख्या वाढते़ यात टायर फुटून होणाऱ्या व रात्रीच्या वेळी अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे़ मात्र, पहिल्या दोन तासांत अर्थात झीरो अवरमध्ये अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत मिळत नसल्याने अतिरक्तस्रावाने अपघातग्रस्तांस जीव गमवावा लागतो़
3यामुळे ही ट्रॉमा केअर सेंटरसह एअर अ‍ॅम्ब्युलन्सची योजना एमएसआरडीसीने आणली आहे़ शिवाय, चार ठिकाणी क्विक रिस्पॉन्स वाहनेही तैनात करण्यात येणार आहेत़

Web Title: Express-Waver Trauma Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.