जीएसटी दराबाबत हॉटेल क्षेत्रात तीव्र नाराजी
By admin | Published: May 23, 2017 02:22 AM2017-05-23T02:22:20+5:302017-05-23T02:22:20+5:30
हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लावण्यात येणाऱ्या जीएसटी दराबाबत सेवाक्षेत्राकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लावण्यात येणाऱ्या जीएसटी दराबाबत सेवाक्षेत्राकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे शुक्रवारी पार पडलेल्या जीएसटी काऊंसिलच्या दोन दिवसीय बैठकीत विविध सेवांवर लागणाऱ्या ‘जीएसटी’चे दर निश्चित करण्यात आले. यात हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सेवांवर आकारण्यात आलेले दर खूपच महागडे आणि न परवडणारे असून याबाबत वित्त आणि पर्यटन मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
म्यानमार, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया आणि अन्य देश केवळ ५ ते १0 टक्के कर आकारत पर्यटकांना आकर्षित करून घेत असताना आपण २८ टक्कयांपर्यत कर आकारणे योग्य होणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यावयास
हवे. हे परवडणारे नसून यामुळे पर्यटक भारतात येणे टाळतील, असे हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी
सांगितले.