Join us

पाणी देयकाच्या अभय योजनेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या!, सुनिल प्रभु यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:54 PM

सदर अभय योजनेला दि. १२ ऑगस्ट, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

मुंबई :  पाच वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दि. १५ फेब्रुवारी, २०२० ते दि १५ मे, २०२० या कालावधीसाठी पाणी देयकासाठी‘अभय योजना २०२०’ राबविण्यात आलेली होती. परंतू सध्याच्या  कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झालेले आहे. अजून ही महामारी आटोक्यात आलेली नाही. भारत देशात विशेषत: महाराष्ट्र राज्यात दि. २५ मार्च पासून टाळेबंदी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर अभय योजनेला दि. १२ ऑगस्ट, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

मुंबई मधील बहुतांश व्यवसाय, उद्योग-धंदे, अद्याप सुरु न झाल्याने मुंबईतील बहुतांश नागरिकांच्या उपजिवीकेची साधने आज उपलब्ध नाहीत, तसेच त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवता न आल्याने बेजार झाले आहेत किंवा अनेक कुटुंब मुंबईबाहेर गावी गेली आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता आलेला नाही. 

यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा विचार करुन सदर योजनेला डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांनी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील पर्यायाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची जास्तीत जास्त थकबाकी वसूल होऊ शकेल याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे.

आणखी बातम्या...

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान    

...अन् अंधेरी एमआयडीसीत बिबट्या अडकला पिंजऱ्यात    

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट    

"वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा    

टॅग्स :सुनील प्रभूमुंबई महानगरपालिकाआदित्य ठाकरे