Join us  

दुकानांपेक्षा निवासी मालमत्तांना जादा कर

By admin | Published: March 20, 2015 2:02 AM

सुधारित मालमत्ता करप्रणालीत निवासी कर ११़७४ टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या पालिकेने दुकानांचा कर मात्र अवघा ९ टक्केच ठेवला आहे़

मुंबई : सुधारित मालमत्ता करप्रणालीत निवासी कर ११़७४ टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या पालिकेने दुकानांचा कर मात्र अवघा ९ टक्केच ठेवला आहे़ या नवीन करवाढीमुळे मुंबईकरांवर ५७८ कोटींचा बोजा पडणार आहे़ तसेच ५०० चौ़ फुटांखालील घरांनाही यापुढे या करवाढीची झळ बसणार आहे़ या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने आज मंजुरी दिली़ यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी प्रस्तावाची प्रत फाडून सभात्याग केला़१ एप्रिल २०१० पूर्वलक्षी प्रभावाने मुंबईतील जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते़ त्या वेळेस ५०० चौ़ फुटांच्या ५४ टक्के निवासी मालमत्तांच्या करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ पाच वर्षे उलटल्यामुळे ५०० चौ़ फुटांखालील घरांना आता मालमत्तेचा वाढीव कर भरावा लागणार आहे़ यावर विरोधी पक्षांनी स्थायी समितीमध्ये आज चिंता व्यक्त केली़निवासी मालमत्तेचे दर सुधारित सूत्रांनुसार ११़७४ टक्के ठेवण्यात आला आहे़ त्याचवेळी व्यावसायिक वापर होणाऱ्या दुकानांना केवळ ९ टक्केच कर भरावा लागणार आहे़ ही तफावत अयोग्य असून, निवासी मालमत्ताधारकांवरील अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि मनसेने केली़ मात्र सत्ताधाऱ्यांनी कानावर हात ठेवल्यामुळे मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला़ यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला़ (प्रतिनिधी)करवाढीतून सुटका झालेल्या ५०० चौ़ फुटांच्या मालमत्तांची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत़ त्यामुळे त्यांचा कर आता ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची तरतूद आहे़ विशेषत: दक्षिण मुंबईतील चाळी व जुन्या इमारतींना प्रति चौ़ फूट १ रुपये मालमत्ता कर भरावा लागत होता़ त्यात ४०% वाढ झाली आहे़ च्इमारतीचे वय, चटईक्षेत्र, बांधकामाचा प्रकार, वापराचा प्रकार, रेडिरेकनरचा दर आणि आकारण्यात येणाऱ्या कराच्या आधारे भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर निश्चित करण्यात येतो़ च्सुधारित मालमत्ता करानुसार १४़५२ टक्के वाढ म्हणजे ५७८ कोटींचा बोजा मुंबईकरांवर पडणार आहे़ निवासी मालमत्तांसाठी हा कर ११़७४ टक्के असणार आहे़ मात्र २७ टक्के वाढ लागू झाल्यास १०९३ कोटींचा भुर्दंड करदात्यांना बसणार आहे़ च्बिल्टअप क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर वसूल केल्यास पालिकेच्या तिजोरीत ५०७७़६२ कोटींचे उत्पन्न जमा होणार होते़ मात्र नवीन सूत्रानुसार कार्पेट क्षेत्रफळाप्रमाणे मालमत्ता कर वसूल होणार असल्याने पालिकेला ४,५६३़३३ कोटी उत्पन्न मिळणार आहे़ दरवर्षी ६ हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़