ST महामंडळातील सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:53 PM2019-08-28T14:53:55+5:302019-08-28T14:58:35+5:30

161 सहायक, 120 लिपिक पदातील उमेदवारांना होणार फायदा...

Extension of additional list of Assistant and Clerical Typewriter posts in ST Corporation divakar rawate | ST महामंडळातील सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

ST महामंडळातील सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

Next
ठळक मुद्देमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा...! 161 सहायक, 120 लिपिक पदातील उमेदवारांना होणार फायदा...

मुंबई - एसटीच्या सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या सरळसेवा भरती सन 2016-17 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विभागाच्या निवड यादी व अतिरिक्त यादीची मुदत संबंधित विभागाच्या निवड व अतिरिक्त यादीवरील अंतिम उमेदवाराची नेमणूक देण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत वाढविण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा केली. याचा फायदा सहायक पदातील 161 उमेदवारांना तसेच लिपिक पदातील 120 उमेदवारांना होणार आहे.

सरळसेवा भरती सन 2016-17 अंतर्गत सहायक व लिपिक-टंकलेखक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतील निवड यादी व अतिरिक्त यादी डिसेंबर 2018 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या, आंतरविभागीय बदली तसेच खाते बढतीमुळे रिक्त होणाऱ्या जागा विचारत घेऊन रिक्त पदांच्या संख्येनुसार तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्यांची मुदतवाढ ही केवळ एक वर्ष असल्यामुळे, तसेच या काळात विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 बाबत सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश प्राप्त होईपर्यंत सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गात फक्त खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागांच्या बढती परीक्षा घेण्यात आल्यामुळे खुला प्रवर्ग वगळता इतर जात प्रवर्गाच्या जागा निर्माण झाल्या नसल्याने सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या निवड यादीवरील बरेच उमेदवार नेमणुकीपासून वंचित राहिले आहेत. सदर उमेदवारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून निवड यादी व अतिरिक्त यादीला मुदत वाढ देण्याचे निर्देश रावते यांनी एसटी महामंडळास दिले. त्यानुसार संबंधित विभागाच्या निवड यादीत अंतिम उमेदवारास नेमणूक देण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत निवड यादीची मुदत वाढविण्यात आली आहे.
 

Web Title: Extension of additional list of Assistant and Clerical Typewriter posts in ST Corporation divakar rawate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.