मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. खासगीरीत्या परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज करायचे असून त्यांना नावनोंदणीसाठी १९ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज, शुल्क, कागदपत्रे २१ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरपर्यंत संबंधित शाळेत सादर करायची आहेत. तर ८ आॅक्टोबरपर्यंत मंडळाकडे अर्ज जमा करायचे आहेत.
१७ नंबरचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:53 AM