Join us

जात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:14 AM

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० ...

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकांच्या कार्यक्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक केले आहे. परंतु अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नाही तर, काही विद्यार्थ्यांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी प्रवेशास अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

-----

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता यादी आज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील आयटीआय प्रवेश इच्छुकांसाठी प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असून, अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्जनोंदणी केली आहे. राज्यात शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार तर खासगी आटीआयमध्ये ५५ हजार, अशा एकूण १ लाख ४८ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. १ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्जनोंदणी सुरू ठेवण्यात आली होती.