सामाईक प्रवेश परीक्षा अर्जप्रक्रियेस मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:08 AM2020-09-06T02:08:15+5:302020-09-06T02:08:22+5:30

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पुढाकार

Extension of common entrance examination application process; Consolation to the students | सामाईक प्रवेश परीक्षा अर्जप्रक्रियेस मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

सामाईक प्रवेश परीक्षा अर्जप्रक्रियेस मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

Next

मुंबई : सामाईक प्रवेश परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्र्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरता आले नाहीत. यासंदर्भात यड्रावकर यांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. विद्यार्थी हिताच्या या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मंजुरी देत बैठकीतच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देश दिले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फेशैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांकरीता (सीईटी) अर्ज भरण्यासाठी ७ व ८ सप्टेंबर असे दोन दिवस एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात आली आहे.

Web Title: Extension of common entrance examination application process; Consolation to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.