Join us

सीएसएमटी-अंधेरी २५ लोकल फे-यांचा गोरेगावपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:28 AM

- महेश चेमटेमुंबई : सध्या सुरू असलेल्या हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम जवळपास पूर्णझाले आहे. यामुळे मध्य रेल्वे सीएसएमटी-अंधेरी मार्गावर चालणा-या २५ फे-यांचा विस्तार गोरेगापर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचा लाभ जानेवारीपासून मिळेल, अशी अपेक्षा आहे.सद्य:स्थितीत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-अंधेरी आणि पनवेल-अंधेरीसाठी १०४ लोकल फे-या धावतात. यात सीएसएमटी-अंधेरी ८६ आणि पनवेल-अंधेरी १८ लोकल फे-यांचा समावेश आहे. यापैकी सीएसएमटी-अंधेरी लोकल फे-यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात येणार आहे.जानेवारी २०१८ मध्ये सुरुवातीला २५ लोकल फे-यांचा विस्तार होणार आहे. त्यानंतर हळूहळू फे-यांची संख्यादेखील वाढवण्यात येणार आहे. विस्तारीकरणामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. भविष्यात गोरेगाववरून थेट पनवेलपर्यंतदेखील लोकल फे-या चालवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचाराधीन असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.पश्चिम रेल्वेचे ‘थांबा आणि पाहा’चर्चगेट ते अंधेरी लोकल फे-यांचा विस्तार करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही. या मार्गावर पश्चिम रेल्वेच्या ६५ लोकल फेºया धावतात. मध्य रेल्वेतर्फे अधिकृत माहिती आल्यानंतर लोकल फेºयांच्या विस्ताराबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.हार्बर मार्ग विस्तारीकरणाचे काम योग्य रीतीने होत आहे. गोरेगावपर्यंतचे बहुतांश काम झाले आहे. डिसेंबरअखेरीस सेवा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर संबंधित रेल्वे प्रशासन लोकल फेºया विस्तारीकरणाचा निर्णय घेईल.- प्रभात सहाय, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

टॅग्स :मुंबई लोकल