Join us

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी मुदतवाढ मागणार; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 4:39 AM

इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी सर्वाेच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट ही ‘कटआॅफ डेट’ ठरवून दिली आहे

- अतुल कुलकर्णीमुंबई : इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी सर्वाेच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट ही ‘कटआॅफ डेट’ ठरवून दिली असली तरी प्रवेशाची मुदत ३१ आॅगस्ट पर्यंत वाढवून घेण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. याआधी अशी मुदत वाढवून मिळालेली आहे. त्यामुळे याहीवर्षी मुदत वाढवून मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.राज्यात ३४० इंजिनीअरिंग महाविद्यालये आहेत. त्यात ८ शासकीय, व उर्वरित खासगी आहेत. त्यात एकूण १ लाख २५ जागा आहेत. सगळी प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या माध्यमातून होत असून हा सेल सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानेच स्थापन झालेला आहे. आजपर्यंत सव्वा लाख जागांसाठी १,०५,००० मुलांचे अर्ज आले असून त्यांची प्रवेश प्रक्रिया चालू आहे.याचवर्षीच्या बारावी परीक्षेत नापास झालेल्या मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेतली होती. त्यांचा निकाल आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागेल. त्यात पास होणाºया मुलांनाही याचवर्षी इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून ही तारीख १५ दिवस वाढवून घेण्यासाठी सरकार सर्वाेच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे एकूण किती जागा भरल्या जातील हे चित्र ३१ आॅगस्टनंतर स्पष्ट होईल असेही तो अधिकारी म्हणाला.आजपर्यंत प्रवेशाचे तीन राऊंड पूर्ण झाले आहेत. आणखी एक राऊंड बाकी आहे. गेल्यावर्षी जवळपास ३५ टक्के जागा रिक्त होत्या. त्याचवेळी काही महत्वाच्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या दोन फेºयातच सगळे प्रवेश पूर्ण झाले होते. विद्यार्थ्यांचा ओढा मनासारखे महाविद्यालय मिळावे याकडे असतो व तेथे प्रवेश मिळत नसेल तर हे विद्यार्थी दुसºया शिक्षणाकडे वळत असल्याचेही शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले.

टॅग्स :सर्वोच्च न्यायालयविद्यार्थीशिक्षण