मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्शाची रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. १.५० लाखाच्या वर आहे, अशा शेतकºयांना रुपये १.५० लाखावरील त्यांच्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये १.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्यात येते.
एकरकमी परतफेडीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 5:05 AM