होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:53 AM2019-06-11T05:53:43+5:302019-06-11T05:54:14+5:30

गुणपत्रिका उपलब्ध न झाल्याने घेतला निर्णय; मुंबई विद्यापीठाकडे आतापर्यंत सहा लाखांहून अधिक अर्ज

Extension of Homi Bhabha State University admission process | होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

Next

मुंबई : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र शासनाने राज्यात नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेच्या अनुपलब्धतेमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने हा विद्यार्थी केंद्रित महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

एलफिन्स्टन महाविद्यालय आणि सिडनहॅम महाविद्यालय मुंबई येथे पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (बायोटेक) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाºया तर सिडनहॅम महाविद्यालयातील बीकॉम, बीएमएस, बीबीआय आणि पदव्युत्तरसाठी एमकॉम (अकाउंट अ‍ॅण्ड बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी त्या-त्या महाविद्यालयातील प्रवेश पुस्तिकेतील सूचनेनुसार आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घ्यायचे आहेत. या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तेरावीसाठी सहा लाखांहून अधिक अर्ज दाखल मुंबई विद्यापीठाकडे येणाºया प्रवेश अर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २ लाख २० हजार ४०० विद्यार्थ्यांकडून तेरावी प्रवेशाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ६ लाख ६१ हजार ६४१ हजार अर्ज प्रप्त झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रियेची सुरुवात २९ मे पासून झाली असून बारावीच्या गुणपत्रिका मिळण्यास होणाºया विलंबामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
च्अर्ज विक्री - २९ मे २०१९ ते १५ जून २०१९ पर्यंत (कार्यालयीन दिवस).
च्प्रवेश अर्ज महाविद्यालयात सादर करण्याची तारीख - ७ जून २०१९ ते १५ जून २०१९ (कार्यालयीन दिवस. इन हाउस अ‍ॅडमिशन या कालावधीत करता येईल.)
च्पहिली गुणवत्ता यादी - १७ जून २०१९ (सायंकाळी ५.०० वाजता)
च्दुसरी गुणवत्ता यादी - २० जून २०१९ (सायंकाळी ५.०० वाजता)
च्तृतीय आणि शेवटची गुणवत्ता यादी - २४ जून २०१९ (सायंकाळी ५ वाजता)
च्कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणे - २५ जून २०१९ ते २७ जून २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

ंउपलब्ध जागा
एलफिन्स्टन महाविद्यालय : बीए १२०, बीकॉम-२४०, बीएस्सी-१२०, बीएस्सी (आयटी) -६०, बीएस्सी बायोटेक-४०
सिडनहॅम महाविद्यालय : बीकॉम-६००, बीएमएस-१२०, बीबीआय-१२०, एमकॉम (अकाउंट, बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स) : २४०

Web Title: Extension of Homi Bhabha State University admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.