Join us

आयडॉलच्या प्रवेशांना मुदतवाढ

By admin | Published: October 17, 2015 1:30 AM

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे. एम.ए. राज्यशास्त्र या अभ्यासक्रमासाठी वायकर यांनी प्रवेश घेतल्याची माहिती आयडॉलने दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वायकर यांच्याप्रमाणेच अनेक नामांकित व्यक्तींनी यंदा आॅनलाइन प्रवेश घेतला आहे. त्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी एमए इंग्रजीसाठी, तर नगरसेविका राजश्री सुर्वे-पालांडे यांनी एमए समाजशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. (प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे जिद्द न सोडलेल्या १४ कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांनी आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घेतला आहे. शिवाय मुंबईतील मालाडच्या मैनादेवी बजाज आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रमुख शगुफ्ता पारकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट येथील ग्रामीण भागातील हुशार असणाऱ्या ९ विद्यार्थिनींचे संपूर्ण प्रवेश शुल्क भरले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे या विद्यार्थिनींना शिक्षण घेता येत नव्हते. पारकर यांनी त्यांचे प्रवेश शुल्क भरून वर्षभर शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिसाद वाढल्याने मुदतीतही वाढआयडॉलच्या आॅनलाइन प्रवेशाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना १९ ते २३ आॅक्टोबरपर्यंत विलंब शुल्कासह प्रवेश अर्ज भरता येणारअसून ही शेवटची संधी आहे. ही मुदतवाढ बीए, बीकॉम, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स, नॉटिकल टेक्नॉलॉजी), एमए, एमए (शिक्षणशास्त्र), एमकॉम (अकाउंटन्स / व्यवस्थापन), एमए/एमएससी (गणित), एमएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र), पीजीडीएफएम (पीजी डिप्लोमा इन फिनान्शिअल मॅनेजमेंट), पीजीडीओआरएम (पीजी डिप्लोमा इन आॅपरेशन्स रिसर्च मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांसाठी असेल.