मास्टर लिस्टमध्ये नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:40 AM2019-07-16T05:40:00+5:302019-07-16T05:40:07+5:30
दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहत् सूची (मास्टर लिस्ट)वरील रहिवाशांची पात्रता निश्चिती आणि गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी मूळ भाडेकरूंकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.
Next
मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहत् सूची (मास्टर लिस्ट)वरील रहिवाशांची पात्रता निश्चिती आणि गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी मूळ भाडेकरूंकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता रहिवाशांकडून अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने म्हाडाने आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आता ३१ जुुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तर सोमवारपर्यंत ३९२ जणांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
कालावधी वाढविण्यात आल्यामुळे आणखी अर्ज दाखल होतील, अशी आशा म्हाडाने व्यक्त केली आहे.