अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कर्जासाठीच्या ३१ जानेवारीपर्यत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:31 PM2019-01-04T21:31:23+5:302019-01-04T21:31:38+5:30
राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया शैक्षणिक कर्जासाठी करावयाच्या अर्जासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई - राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया शैक्षणिक कर्जासाठी करावयाच्या अर्जासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांना त्यासाठी आता ३१ जानेवारीपर्यत अर्ज करता येणार आहेत.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक आणि एमबीए, एमबीबीएस, बीई आदी उच्च अभ्यासक्रमासाठी कर्ज दिले जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी त्याबाबतची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून आॅनलाईन सुरु करण्यात आली होती. मात्र विहित नमुन्यात अर्ज करण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यत वाढविली होती. मात्र अद्यापही अपेक्षित अर्ज न आल्याने त्यासाठी ३१ जानेवारीपर्यत मुदत वाढविण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.