अधिवास दाखला देण्यासाठी मुदतवाढ, फेरीवाल्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:39 AM2019-08-11T02:39:39+5:302019-08-11T02:39:57+5:30

अधिकृत परवान्यासाठी केवळ २० टक्केच फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत सादर केली आहेत.

Extension for occupancy certificates | अधिवास दाखला देण्यासाठी मुदतवाढ, फेरीवाल्यांना मोठा दिलासा

अधिवास दाखला देण्यासाठी मुदतवाढ, फेरीवाल्यांना मोठा दिलासा

Next

- शेफाली परब
मुंबई : अधिकृत परवान्यासाठी केवळ २० टक्केच फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत सादर केली आहेत. अधिवास दाखला मिळण्यास विलंब होत असल्याचा फटका बहुतांशी फेरीवाल्यांना बसला आहे. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी फेरीवाल्यांना आता २५ आॅगस्टपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार महापालिकेने २०१४ मध्ये अर्ज मागविले. त्यानुसार ८९ हजार फेरीवाल्यांना पात्रतेसाठी अधिवास दाखला देणे बंधनकारक करण्यात आले. आतापर्यंत केवळ १६ हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे सादर केल्यामुळे ते पात्र ठरले आहेत. निम्म्याहून अधिक फेरीवाल्यांना कागदपत्रे सादर करण्यास कमी अवधी मिळाल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने मुदत वाढवून दिली आहे.

फेरीवाल्यांना आता दोन आठवड्यांत म्हणजे २५ आॅगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर सर्व कागपत्रांची छाननी करून पात्र फेरीवाल्यांची यादी तयार होईल, असे बाजार खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

धार्मिक स्थळाजवळ मिळणार पूजेचे साहित्य

फेरीवाल्यांना परवाने देताना त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व माहिती एकत्र करण्यात आली.
पालिकेच्या फेरीवाला धोरणात मंदिर आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना परवाना देण्यात येणार नाही. या परिसरात फक्त पूजेचे साहित्य विकण्यासाठीचा परवाना देण्यात येईल.
अधिवास दाखला देणाऱ्या अर्जदारांना पालिकेकडून फेरीवाला परवाना देण्यात येणार आहेत.
३० टक्के फेरीवाले विस्थापित झाल्यामुळे अनेक पत्रे परत आली. अधिवास दाखला सादर करण्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ यापूर्वी देण्यात आली होती.
 

Web Title: Extension for occupancy certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.