बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 06:02 AM2023-06-13T06:02:14+5:302023-06-13T06:02:27+5:30

विद्यार्थ्यांनी २९ मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरले होते

Extension of date till June 18 for filing applications for 12th supplementary examination | बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदतवाढ

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर आता बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी २९ मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरले होते तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील.

बारावीची पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १८ जूनपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

  1. ‘या परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जात आहेत.
  2. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जामध्ये समाविष्ट करता येणार आहे. 
  3. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ अशा लागोपाठ दोनच संधी उपलब्ध असतील,’ असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Extension of date till June 18 for filing applications for 12th supplementary examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा