एजंटसना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी महारेराची मुदतवाढ

By सचिन लुंगसे | Published: September 20, 2023 10:42 AM2023-09-20T10:42:13+5:302023-09-20T10:42:26+5:30

१ जानेवारीनंतर फक्त प्रमाणपत्रधारक एजंटसचीच मदत घ्यावी, महारेराचे विकासकांना निर्देश

Extension of Maharera for obtaining certificates for agents | एजंटसना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी महारेराची मुदतवाढ

एजंटसना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी महारेराची मुदतवाढ

googlenewsNext

मुंबई:  महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले होते. नव्याने नोंदणी करणाऱ्यांना मे पूर्वी आणि कार्यरत एजंटसना 1 सप्टेंबर पूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करणे  बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले होते.  हा कालावधी वाढविण्यात यावा यासाठी अनेक विकासक आणि एजंटसकडून महारेराकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. 

यानुसार महारेराकडे एजंट म्हणून नव्याने नोंदणी करण्यासाठी किंवा असलेल्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी 1 नोव्हेंबरपूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करणे आता बंधनकारक राहील. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नुतनीकरणही होणार नाही. तसेच सध्याच्या परवानाधारक एजंटसना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 24 पूर्वी हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदवणे ( upload) आवश्यक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर महारेरा यथोचित कारवाई करेल. यासोबतच सर्व विकासकांनी 1 जानेवारीनंतर प्रमाणपत्र नसलेल्या एजंटसना त्यांच्या प्रकल्पाशी संबंधित व्यवहारात सहभागी करून घेऊ नये, असेही स्पष्ट निर्देश महारेराने दिले आहेत.

10 जानेवारीला याबाबतचा निर्णय महारेराने जाहीर केल्यानंतर  विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांसोबत इतर संस्थांनीही या अनुषंगाने अनेक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले  होते. मोठ्या प्रमाणात आयोजित या कार्यक्रमांना महारेरातील वरिष्ठांसोबतच या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही हजर राहून मार्गदर्शन केलेले आहे. एजंटसना प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी महारेराने सुमारे 8-9 महिन्यांचा  वेळ दिलेला आहे.  स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच  मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन रेरा  कायद्यामध्येही त्याचे अस्तित्व अधोरेखित करण्यात आलेले आहे.

 या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना  रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. ज्यात विकासक आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची  वैद्यता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध, असल्यास, कज्जेदलालीचा तपशील , संबंधित विकासकाची आर्थिक क्षमता याबाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या हे त्यांना माहीत असायला हवे. शिवाय त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) ,  दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक  माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टताअसायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच  महारेराने एजंटसने  प्रशिक्षण  घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे.

Web Title: Extension of Maharera for obtaining certificates for agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई