तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठीही मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर
By स्नेहा मोरे | Published: October 21, 2023 06:20 PM2023-10-21T18:20:30+5:302023-10-21T18:20:44+5:30
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परिषदेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती.
मुंबई - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महाविद्यालये, विद्यापीठांतील रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परिषदेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांवर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांच्या संलग्नतेसाठीही ३० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत आहे.