लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनेमुंबई ते दानापूर आणि पुणे ते दानापूरदरम्यान आणखी २२ विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी गेलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - सिवान साप्ताहिक स्पेशल २६ नोव्हेंबरपर्यंत ऐवजी ३ डिसेंबर २०२३ पर्यंत चालविण्यात येईल. तर छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष १ डिसेंबरपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - दानापूर साप्ताहिक स्पेशल ९ डिसेंबर २०२३ पर्यंत, दानापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष १० डिसेंबर २०२३ पर्यंत, पुणे - दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष १४ डिसेंबरपर्यंत असणार आहे.
दानापूर- पुणे द्वि-साप्ताहिक विशेष १५ डिसेंबरपर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
याशिवाय पुणे - दानापूर साप्ताहिक स्पेशल, दानापूर - पुणे साप्ताहिक स्पेशल, पुणे - दानापूर साप्ताहिक स्पेशल गाड्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.