पोलीस भरतीतील उमेदवारांना विकल्प व पासवर्ड बदलासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:08 AM2021-08-17T04:08:32+5:302021-08-17T04:08:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदाच्या भरतीतील उमेदवारांना पासवर्ड व विकल्प ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदाच्या भरतीतील उमेदवारांना पासवर्ड व विकल्प निवडण्यासाठी आणखी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २२ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत त्यांना ऑनलाईन बदल करता येणार आहे.
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत (एसईबीसी) अर्ज भरला आहे, त्यांना आर्थिक दुर्बल प्रवर्ग (ईबीसी) किंवा खुल्या गटातून परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्व उमेदवारांना पासवर्ड बदल करणे आवश्यक होते. मात्र अनेकांजण स्वतःचा ईमेल आयडी, पासवर्ड विसरल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे त्यांना ईमेल अपडेट करण्यासाठी www.mahapolice.gov.in संकेतस्थळावर जाऊन ‘पोलीस कॉर्नर’ व पोलीस भरती २०१९ या बटणावर क्लीक करून बदल करावयाचे आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पोलीस घटकनिहाय लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
२०१९ च्या ५२९७ रिक्त पदांसाठी ११ लाख ९७ हजार ४१५ इतके विक्रमी अर्ज आले आहेत. त्यावेळी जाहिरातींमध्ये ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत (एसईबीसी) अर्ज भरला आहे, त्यांना आर्थिक दुर्बल प्रवर्ग (ईबीसी) किंवा खुल्या गटातून परीक्षा देता येणार आहे.