वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याचा विस्तार; रेल्वेची वसाहत हटवून जागा पालिकेकडे होणार हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:02 AM2017-12-24T03:02:33+5:302017-12-24T03:02:42+5:30

पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे स्थानकाचा परिसर वर्दळीचा आहे. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकालगत पश्चिमेकडील रस्त्याचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी रेल्वेची वसाहत हटवून ती जागा पालिकेला हस्तांतरित केली जाईल.

Extension outside the Bandra railway station; Removal of railway colony will be transferred to the Municipal Corporation | वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याचा विस्तार; रेल्वेची वसाहत हटवून जागा पालिकेकडे होणार हस्तांतरित

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याचा विस्तार; रेल्वेची वसाहत हटवून जागा पालिकेकडे होणार हस्तांतरित

Next

मुंबई : पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे स्थानकाचा परिसर वर्दळीचा आहे. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकालगत पश्चिमेकडील रस्त्याचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी रेल्वेची वसाहत हटवून ती जागा पालिकेला हस्तांतरित केली जाईल.
एल्फिन्स्टन स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीनंतर सर्व रेल्वे स्थानकांबाहेरील अरुंद रस्त्यांचा विस्तार करण्याची मागणी होत आहे. वांद्रे स्थानकदेखील प्रचंड वर्दळीचे व महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम आणि हार्बर असे दोन मार्ग येथे येऊन मिळतात. त्यामुळे या स्थानकात दिवसभर पादचारी वर्गाची वर्दळ असते. या स्थानकाबाहेर पादचारी वर्गाच्या सोयीसाठी रस्ता रुंदीकरण व सौंदर्यीकरण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यानुसार या जागेवरील रेल्वेची कर्मचारी वसाहत हटवून ती जागा पालिकेला वापरासाठी देण्यात येणार आहे. या जागेच्या मोबदल्यात पालिका रेल्वे प्राधिकरणाला २ कोटी २५ लाख रुपये एकरकमी देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

महिन्याभरात काम सुरू
रेल्वे वसाहत हटवून मिळालेली जागा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची रुंदी १० ते २० फूट वाढविण्याच्या कामी येणार आहे. रुंदीकरणाचे काम महिन्याभरात सुरू होणे अपेक्षित आहे. यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.

असे होणार सौंदर्यीकरण : वांद्रे रेल्वे स्थानक हे पुरातन वास्तू श्रेणी १ मध्ये गणले जाते. या प्रकल्पांतर्गत या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यानुसार, काही महिन्यांत येथे पायवाट, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि आॅटो रिक्षा स्टँड तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Extension outside the Bandra railway station; Removal of railway colony will be transferred to the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई