मुंबई : लॉकडाऊन काळात देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्या धावत आहेत. आता, मध्य रेल्वे मार्गावरील पार्सल गाड्यांची मुदतवाढ ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
देशभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. त्यानंतर पुढील आदेशपर्यंत सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, औषधे, नाशवंत पदार्थ यांसारख्या जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा सुरु ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक येथून देशभरातील विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तूसाठी पार्सल गाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांची मुदतवाढ ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे. ज्यामध्ये सीएसएमटी - शालीमार पार्सल, सीएसएमटी - चेन्नई सेंट्रल पार्सल आणि चेन्नई सेंट्रल -सीएसएमटी पार्सल या रेल्वे गाड्याचा समावेश आहेत.