पोलीस बंदोबस्तातील पदांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 07:44 AM2018-01-26T07:44:58+5:302018-01-26T07:45:20+5:30
खासगी व्यक्ती व आस्थापनासाठी पुरविण्यात येणाºया सशस्त्र पोलीस बंदोबस्तासाठीच्या राज्यातील एकूण १४८२ विविध दर्जाच्या अस्थायी पदांना दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली
मुंबई : खासगी व्यक्ती व आस्थापनासाठी पुरविण्यात येणाºया सशस्त्र पोलीस बंदोबस्तासाठीच्या राज्यातील एकूण १४८२ विविध दर्जाच्या अस्थायी पदांना दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.
पोलीस दलाकडून धोका असलेल्या सेलिब्रिटी, बिल्डर व राजकीय नेत्यांना संरक्षण देण्यात येते. त्यासाठी राज्य सरकारने २०१२पासून विशेष संरक्षण विभाग कार्यान्वित करून अस्थायी स्वरूपात त्या ठिकाणी काही पदे वर्ग करण्यात आली आहेत. एकूण १४९२ पदे असून, त्यात सर्वाधिक ४११ पदे मुंबईतील आहेत. गेल्या वर्षी या पदांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही संबंधित अधिकारी व अंमलदार कामाच्या ठिकाणी कार्यरत असल्याने या पदासाठी आता २८ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे गृहविभागातील सूत्रांनी सांगितले. मुंबईतील ४११ पदांमध्ये १ उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, ९ निरीक्षक आणि ४४ सहायक निरीक्षकांचा समावेश आहे.