उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:07 AM2020-12-25T04:07:07+5:302020-12-25T04:07:07+5:30
सुधारित वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर जारी, कॅप फेरीचा तपशील जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ...
सुधारित वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर जारी, कॅप फेरीचा तपशील जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसायिक प्रवेशाच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळावा म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रमनिहाय अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली असून, सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.
सीईटी सेलकडून फार्मसी, अभियांत्रिकी (बी ई, बी टेक), एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एम ई, हॉटेल मॅनेजमेंट, एलएलबी यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधीही अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना येत असल्याने आठवड्याभराची मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, २२ ते २५ डिसेंबरदरम्यान यातील अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदतवाढ संपत असल्याने आणखी काही दिवस मुदत वाढवून देऊन एसईबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाचे पहिल्या कॅप राउंडचे सुधारित वेळापत्रक
१) बी ई, बी टेक, बी फार्मसी
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - ३० डिसेंबर २०२०
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - ३१ डिसेंबर २०२० पर्यंत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - २ जानेवारी २०२१
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - ६ जानेवारी २०२१
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - १४ ते १६ जानेवारी २०२१
२) एमबीए, एमएमएस
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - २९ डिसेंबर २०२०
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - ३० डिसेंबर २०२० पर्यंत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - १ जानेवारी २०२१
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - ५ जानेवारी २०२१
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - १२ ते १४ जानेवारी २०२१
३) एमसीए
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - २९ डिसेंबर २०२०
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - ३० डिसेंबर २०२०
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - १ जानेवारी २०२१
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - ५ जानेवारी २०२१
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - ११ ते १३ जानेवारी २०२१
बी आर्किटेक्चर
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - २९ डिसेंबर २०२०
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - ३० डिसेंबर २०२०
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ३१ डिसेंबर २०२०
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - ४ जानेवारी २०२१
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - १० ते १२ जानेवारी २०२१
एलएलबी ५ वर्ष, एलएलबी ३ वर्ष, बी एड
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - ३१ डिसेंबर २०२०
बी पी एड, एम पी एड , एम एड प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - ३० डिसेंबर २०२०