मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:49 AM2019-06-08T03:49:22+5:302019-06-08T03:49:27+5:30
आतापर्यंत १ लाख ९० हजार ४६० विद्यार्थ्यांची नोंदणी; गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेच्या अनुपलब्धतेमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीचे सुधारित वेळापत्रक निर्गमित केले आहे.
२९ मे २०१९ पासून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाइन नावनोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख ९० हजार ४६० एवढ्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या नोंदणी केली असून त्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ५ लाख ५६ हजार ९८७ एवढे अर्ज केले आहेत.
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीचे सुधारित वेळापत्रक
अर्ज विक्री - २९ मे २०१९ ते १५ जून २०१९ पर्यंत (कार्यालयीन दिवस)
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया - २९ मे २०१९ ते १५ जून २०१९
अॅडमिशनच्या अर्जाची प्रिंटआउट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख - ०७ जून २०१९ ते १५ जून २०१९ (प्रवेशपूर्व नोंदणी अर्र्ज आवश्यक) इनहाउस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
पहिली गुणवत्ता यादी - १७ जून २०१९ (सायंकाळी ५.०० वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - १८ जून २०१९ ते २० जून २०१९ (दुपारी २.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)
दुसरी गुणवत्ता यादी - २० जून २०१९ (सायंकाळी ५.०० वा.)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २१, २२ आणि २४ जून २०१९ (दुपारी २.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस)
तिसरी आणि शेवटची गुणवत्ता यादी - २४ जून २०१९
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २५ जून २०१९ ते २७ जून २०१९ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस )
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नोंदणीसाठी
mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (click on-Mumbai University Pre Admission online Registration 2019-20) या लिंकवर विद्यार्थ्यांनी क्लिक करावे. विद्यार्थी ०२०६६८३४८२१ या हेल्पलाइनवरही संपर्क करूशकतात.