‘क्लीन अप मार्शल’विरुद्ध तक्रार आल्यास हकालपट्टी; पालिका प्रशासनाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:09 AM2018-11-10T04:09:59+5:302018-11-10T04:11:24+5:30
सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शलची फौज आणली. काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत.
मुंबई : सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शलची फौज आणली. काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत. यापुढे मार्शल्सबाबत तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल महापालिका घेणार आहे. संबंधित मार्शलची चौकशी करून त्याची सेवाच खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून, थुंकून मुंबईत अस्वच्छता पसरविणाºयांवर क्लीन अप मार्शल्सच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते़ काही मार्शल नागरिकांशी तोडपाणी करीत असल्याचे समोर आले, तर काही जबरदस्तीने दंड वसूल करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे २००७ मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात आली होती.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सफाई सुरू असताना अशा क्लीन अप मार्शल्सची आवश्यकता पालिकेला प्रकर्षाने जाणवली.
परिणामी ही योजना पुनर्जीवित करण्यात आली. परंतु, मार्शल्सबाबत अधूनमधून तक्रारी येत असतात. स्वच्छ भारत अभियानाचे पथक मुंबईत आले, तेव्हाही काही ठिकाणी मार्शल्स अपेक्षित जागेवर नव्हते. याची दखल घेऊन पुढच्या महिन्यात नवीन संस्थेची नियुक्ती करताना मार्शल्सना जरब बसेल, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे.
मुंबईच्या स्वच्छतेसाठी या पथकाला पुनर्जीवन मिळाले
२००७ मध्ये मुंबईत क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली होती.
सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाºया नागरिकांना दंड करण्याची जबाबदारी
या पथकावर होती.
नागरिकांकडून जबरदस्तीने दंड वसुली, सार्वजनिक परिसर अस्वच्छ
करणाºयाकडून लाच घेऊन त्यांना सोडून देणे, अशा तक्रारी आल्यानंतर ही
योजना बंद करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईच्या
स्वच्छतेसाठी या पथकाला पुनर्जीवन मिळाले.