मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील ज्या लेखाधिकाऱ्यास अरुण निटुरे यांनी मारहाण केली त्या लेखाधिकाऱ्याची तसेच आॅपरेटर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे.लेखाधिकाºयाला त्याच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले. विशिष्ट कामाची फाईल नेमकी कुठे आहे याची माहिती देण्याच्या मोबदल्यात ‘अर्थ’पूर्ण व्यवहार करण्याचा आरोप असलेल्या दोन आॅपरेटरनाही कार्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. असेच व्यवहार करण्याबाबत ज्यांची विभागात जोरदार चर्चा आहे अशा डॉ.सोनवणे-माने जोडीबाबत बडोले काय निर्णय घेतात या बाबत उत्सुकता आहे.मारहाण प्रकरणाची आपण स्वत: चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे बडोले यांनी लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर खुलासा करताना म्हटले होते. सूत्रांनी सांगितले की यापुढे आपल्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचारी, अधिकाºयामुळे बदनामी ओढावली तर त्याला घरी बसवले जाईल, असे बडोले यांनी बजावले आहे.कंत्राटदारांनी मिळविला हायकोर्टातून स्थगनादेशबडोले यांच्या कार्यकाळात बीव्हीजी आणि क्रिस्टल या दोन कंपन्यांना कोणतीही निविदा न काढता कोट्यवधी रुपयांची स्वच्छता, देखभालीचे कंत्राट देण्यात आले. लोकमतने त्यावर प्रकाश टाकला होता. अखेर विभागाने या दोन कंपन्यांचे कंत्राट संपुष्टात आल्याचा आदेश गेल्या महिन्यात काढला. तथापि, या दोन्ही कंपन्यांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला आहे. त्यामुळे विभागाच्या आदेशानंतरही त्याच कंपन्यांकडे कंत्राट कायम आहे.
बडोलेंच्या कार्यालयातील तीन जणांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:31 AM