मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली विशेष ट्रेनला जादा डबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:29 PM2020-05-14T21:29:17+5:302020-05-14T21:29:27+5:30
१२ मे रोजी विशेष ट्रेनची पहिली फेरी मुंबई सेंट्रलहुन नवी दिल्लीसाठी रवाना करण्यात आली. त्या ट्रेनने १ हजार ४७८ प्रवासी दिल्लीला गेले होते.
मुंबई : रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील काही प्रमुख मार्गावर विशेष ट्रेन चालविण्यास सुरुवात केली आहे. या ट्रेनने दिल्लीहुन मुंबईला १ हजार ७२ प्रवासी आले. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि 5 द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहेत. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याकारणाने आता या विशेष ट्रेनला अतिरिक्त द्वितीय श्रेणीचा एसीचा एक डबा जोडण्यात येणार आहे.
कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र ५० दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने १२ मे टप्प्याटप्प्याने पुन्हा रेल्वे सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील ३० वातानुकूलित ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्ली ते दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी या गाड्या सोडण्यात आल्या. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्टेशनवरून या गाड्या दिल्लीसाठी सुटण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन केले आहे.
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल १ हजार ७२ प्रवाशांचा प्रवास
१२ मे रोजी विशेष ट्रेनची पहिली फेरी मुंबई सेंट्रलहुन नवी दिल्लीसाठी रवाना करण्यात आली. त्या ट्रेनने १ हजार ४७८ प्रवासी दिल्लीला गेले होते. त्यानंतर १३ मे रोजी नवी दिल्लीहुन मुंबई सेंट्रलसाठी ट्रेन रवाना झाली. हि गाडी गुरुवारी सकाळी ८.४५ सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकात आली. त्यामधून १ हजार ७२ प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी एसटीने ८ विशेष बस चालविल्या. पालघर,कल्याण, भिवंडी, पुणे, कोल्हापूर करिता एकुण ८ बस सोडण्यात आल्या.
१५ मे पासून जादा डबे
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल विशेष ट्रेनला अतिरिक्त द्वितीय श्रेणीचा एसी एक जादा कोच जोडण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रलहुन १५ ते १९ मे आणि नवी दिल्लीहुन १६ ते २० मे दरम्यान धावणाºया गाडीला हा अतिरिक्त कोच असणार आहे.