Join us

उपनगरांनाही द्या जादा एफएसआय - विकासकांची आयुक्तांकडे मागणी

By admin | Published: March 18, 2016 2:46 AM

क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा निकष उपनगरामध्येही लागू करण्यात यावा, अशी मागणी

मुंबई : क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा निकष उपनगरामध्येही लागू करण्यात यावा, अशी मागणी विकासकांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पालिका मुख्यालयात आयोजित एका बैठकीत केली़ विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या मागण्यांचा विचार होण्याची शक्यता आहे़विकास नियंत्रण नियमावली तयार करताना विकासक आणि वास्तुविशारद यांची भूमिकाही जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी आज ही बैठक बोलावली होती़ दक्षिण मुंबईत चार हजार चौरस फुटांपेक्षा जादा क्षेत्रफळातील इमारतींचा पुनर्विकास केल्यास क्लस्टर डेव्हल्पमेंट अंतर्गत विविध सुविधा मिळतात़ त्याचबरोबर उपकरप्राप्त इमारतींचा विकास करताना अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक मिळतो़ मात्र उपनगरात या सुविधा मिळत नसल्याने पुनर्विकासावर निर्बंध येत आहेत़ त्यामुळे उपनगरातील जुन्या इमारतींचा याच निकषांच्या आधारे पुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात यावी़ तसेच चटईक्षेत्र निर्देशांकाबाबत दक्षिण मुंबई आणि उपनगरामध्ये असलेली तफावत मिटविण्यात यावी, अशी मागणी विकासकांनी या बैठकीत केली़ अशा काही प्रमुख मागण्यापालिकेनेच सुनावणी करावीइमारतीच्या आराखड्याचा प्रस्ताव पालिकेने फेटाळल्यानंतर त्यावर राज्य सरकारकडे सुनावणी होण्याऐवजी पालिकास्तरावरच प्रश्न सोडवावा, अशी मागणी पुढे आली आहे़बेसमेंटची जागा पार्किंगसाठी राखून ठेवण्यात येते़ मात्र प्रतिबंधित क्षेत्रात उदा़ विमानतळ परिसरातही निर्बंध आहेत़ त्यामुळे पार्किंगव्यतिरिक्त सुविधांसाठीही भूमिगत जागेचा वापर करून देण्याची सूचना करण्यात आली आहे़ बेसमेंटचा व्यावसायिक वापर व गच्चीपर्यंत लिफ्टची परवानगी देण्यात यावी़कचऱ्याचा प्रकल्प चटईक्षेत्रातून वगळावा : नव्या इमारतींना ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणे सक्तीचे करण्यात आले आहे़ मात्र कचरा वर्गीकरणासाठी राखीव जागा चटईक्षेत्र निर्देशांकातून वगळण्याची मागणी विकासकांनी केली आहे़