‘आयडॉल’ प्रवेशासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:22 AM2018-10-21T06:22:37+5:302018-10-21T06:22:47+5:30

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमधील (आयडॉल) प्रवेशप्रक्रियेला यंदा पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे.

Extra till 30 o'clock in 'Idol' access | ‘आयडॉल’ प्रवेशासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

‘आयडॉल’ प्रवेशासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमधील (आयडॉल) प्रवेशप्रक्रियेला यंदा पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे. ‘आयडॉल’ प्रवेशासाठी २० आॅक्टोबर ही शेवटची तारीख विद्यापीठाने जाहीर केली होती. मात्र, काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल उशिराने लागल्यामुळे त्यांनाही प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी आयडॉल प्रवेश निश्चितीसाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पदवी स्तरावरील बीए, बीकॉम, बीएससी (आयटी), बीएससी (कम्प्युटर सायन्स), एमए, एमए (एज्युकेशन), एमकॉम, एमएससी (गणित, आयटी, कॉम्प्यूटर सायन्स), द्वितीय व तृतीय वर्ष एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ असेल. आतापर्यंत आयडॉलमध्ये ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात हा आकडा ६८,५६८ एवढा होता. म्हणजे यंदा चौथ्यांदा मुदतवाढ देऊनही आयडॉलला अद्याप गेल्या वर्षीचा आकडा गाठता आलेला नाही.
>‘निकाल लवकरच जाहीर करणार’
आयडॉलचे बीएससी (आयटी) विषयाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या परीक्षा आॅगस्टमध्ये झाल्या आहेत. परीक्षा होऊन ६५ दिवस उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधला असता, येत्या २ ते ३ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल, तसेच आवश्यक तेव्हा प्रवेशासाठी आता जाहीर केली, तशी मुदतवाढ देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी दिली.

Web Title: Extra till 30 o'clock in 'Idol' access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.