Join us

एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग

By admin | Published: June 24, 2014 12:22 AM

घरात एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुरिअर बॉयला इमारतीतल्या अन्य रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

मुंबई  : घरात एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुरिअर बॉयला इमारतीतल्या अन्य रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. शिवडीच्या जकेरीया मार्गावरील एका इमारतीत सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
अर्शद अन्वर शेख (22) असे या कुरिअर बॉयचे नाव असून, तो अंधेरीतील एका कुरिअर कंपनीत काम करतो. आज दुपारी तो जकेरिया मार्गावरील एका इमारतीत आला होता. या इमारतीत राहणा:या एका कुटुंबाकडे अर्शदच्या कुरिअर कंपनीने चुकून पार्सल धाडले होते. ते परत घेण्यासाठी तो आला होता. संबंधित कुटुंबाकडे काम करणारी मोलकरीण घरी एकटीच होती. अर्शदने घडलेली चूक सांगून तिला ते पार्सल देण्याची विनवणी केली. मात्र मालक घरी नसल्याने तुम्ही उद्या या, असे तिने अर्शदला सांगितले. उद्या यायला माङयाकडे वेळ नाही, असे प्रत्युत्तर केल्यानंतर मोलकरणीने अर्शदला पार्सल मिळणार नाही, असे बजावले. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात अर्शदने घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर मोलकरणीने दार लावण्यासाठी धडपड सुरू केली. अखेर अर्शदने घरात शिरून मोलकरणीला मारहाण केली. तिचा विनयभंग केला.
मोलकरणीने आरडाओरडा करून  रहिवाशांना सतर्क केले. त्यांनी पाठलाग करून अर्शदला पकडले आणि रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला विनयभंग, मारहाणीच्या आरोपावरून अटक केली. (प्रतिनिधी)