Join us

कोकणाला अतिवृष्टीचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी कोसळलेल्या पावसाने शनिवारी मात्र विश्रांती घेतली. अगदी सकाळी, दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी कोसळलेल्या पावसाने शनिवारी मात्र विश्रांती घेतली. अगदी सकाळी, दुपारी आणि सायंकाळी तुरळक ठिकाणी कोसळलेल्या हलक्या सरी वगळल्या तर पावसाने उघडीप घेतली होती. आता १८, १९, २० आणि २१ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. तर २० आणि २१ जुलै रोजी घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात आता विरुन गेला आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर अरबी समुद्र ते दक्षिण आंध्र किनारपट्टीपर्यंत पूर्व पश्चिम द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईत ३१.२ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझड सुरुच आहे. एकूण पाच ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या सोळा तक्रारी प्राप्त झाल्या.