कमाल-किमान तापमानात कमालीचा फरक; उकाडा तापदायक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:33 AM2018-10-27T04:33:17+5:302018-10-27T04:33:29+5:30
मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान २० तर कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान २० तर कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावतीसह वातावरणातील बदलाचा फटका मुंबईकरांना बसत असून, कडाक्याचे ऊन आणि उकाडा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. २६ ते ३० आॅक्टोबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २७ व २८ आॅक्टोबर रोजी मुंबई आणि आसपाच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील.