Join us

कुर्ला रेल्वे स्थानकावर पास डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांचा अत्यंत अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:32 AM

Kurla railway station: बुधवार पहाटेपासून कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम येथील तिकीट काऊंटरच्या येथे महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी बसले आहेत.

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकावर पास डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. बुधवार पहाटेपासून कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम येथील तिकीट काऊंटरच्या येथे महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी बसले आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ उडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. सकाळपासून कुर्ला पूर्व येथील केंद्रावर २५ व पश्चिम येथील केंद्रावर ३० प्रवाशांना स्मार्ट फोनवर मोबाईल पास डाउनलोड करून देण्यात आला असल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. अनेक नागरिकांनी आधार कार्ड व पॅन कार्ड सोबत न आल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले. येत्या काही दिवसात पास डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू शकते असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे