१८ महिन्यांनंतर आईने उघडले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:01 AM2018-04-07T07:01:48+5:302018-04-07T07:01:48+5:30

गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रसूतीच्या वेळेस काही अडचणींना सामोरे जावे लागते. अशाच एका पद्धतीची प्रसूती नुकतीच जसलोक रुग्णालयात पार पडली.

 The eyes opened by the mother after 18 months | १८ महिन्यांनंतर आईने उघडले डोळे

१८ महिन्यांनंतर आईने उघडले डोळे

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रसूतीच्या वेळेस काही अडचणींना सामोरे जावे लागते. अशाच एका पद्धतीची प्रसूती नुकतीच जसलोक रुग्णालयात पार पडली. या रुग्णालयात दोन बाळांच्या जन्मानंतर आई काही काळाने कोमात गेली होती. दोन दिवसांपूर्वी डीप ब्रेन स्टीम्युलेशन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या लहानग्यांच्या आईला वाचविले असून तिने तब्बल १८ महिन्यांनंतर डोळे उघडले.
आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे या महिलेला जुळ्या मुलांची चाहूल लागली. त्यानंतर तिची प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली. सिझेरियन झाल्यानंतर काही वेळात ती कोमामध्ये गेली. बाहेरचे जग पाहिल्यावर या जुळ्या बाळांनी आईचा स्पर्शदेखील अनुभवला नाही. मुलुंड येथील एका मॅटर्निटी रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली. कोमामध्ये गेल्यावर या महिलेला डॉक्टरांनी जसलोक रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. येथे आल्यानंतर या महिलेच्या काही तपासण्यांनंतर तिच्या मेंदूमध्ये इजा असल्याचे निदर्शनास आले.
रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोषी यांच्या अधिपत्याखाली जपानी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या महिलेवर डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्लोबल हायपोक्सिक अशी मेंदूची दुखापत या महिलेला झाल्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. जानेवारीमध्ये या महिलेची प्रसूती झाल्यानंतर ती कोमामध्ये होती. तिची काहीच प्रगती नसल्याने अखेर हा निर्णय घेतला गेला.
कोमामधील रुग्णावर डीबीएस सर्जरी करणे हे कदाचित पहिल्यांदाच झाले आहे. डॉक्टरांच्या टीमसाठी एक आव्हान होते, कारण या महिलेवर तिच्या दोन बाळांची जबाबदारी आहे, असे डॉ. परेश दोषी यांनी सांगितले.

Web Title:  The eyes opened by the mother after 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.