अंधेरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला!
By admin | Published: May 24, 2017 01:59 AM2017-05-24T01:59:40+5:302017-05-24T01:59:40+5:30
रेल बढे, देश बढे’ या धर्तीवर मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या विकासकामांनागती मिळत आहे. पादचारी पूल, फूड प्लाझा, बूक स्टॉल, स्कायवॉक अशा सुविधांनी अंधेरी स्थानक सुसज्ज आहे
महेश चेमटे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘रेल बढे, देश बढे’ या धर्तीवर मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या विकासकामांनागती मिळत आहे. पादचारी पूल, फूड प्लाझा, बूक स्टॉल, स्कायवॉक अशा सुविधांनी अंधेरी स्थानक सुसज्ज आहे. अंधेरी स्थानकाचे सध्याचे रूप आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा लवकरच सर्व स्थानकांमध्ये उपलब्ध होतील, असा विश्वास रेल्वेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेवरील १० स्थानके, मध्य मार्गावरील ८ आणि हार्बर मार्गावरील २ स्थानकांसाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर ही स्थानके मेट्रो आणि मोनो मार्गाशीदेखील जोडण्यात येणार आहेत. त्या धर्तीवर १९२८ साली सुरू झालेल्या अंधेरी स्थानकातील विकासकामे सर्वात आधी पूर्ण करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत या स्थानकातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून ती प्रवासी सेवेत दाखल करण्यात आली आहेत.
अंधेरीत रेल्वे स्थानकाला मेट्रोशी जोडणारा पादचारी पूल मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व फलाटांना जोडणारे स्कायवॉक आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट आणि सरकते जिने उपलब्ध आहेत. शिवाय फूड प्लाझा, बूक स्टॉल, प्रथमोपचार कक्ष आहेत.
मेट्रो, हार्बर आणि पश्चिम मार्ग एकत्रित असल्याने स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकावरील ९ फलाटांच्या माध्यमाने रोज सरासरी २ लाखांच्या आसपास प्रवासी अंधेरी स्थानकातून प्रवास करतात. प्रवाशांसाठी २५ तिकीट बूकिंग कार्यालय, ३९ एटीव्हीएम मशीन, ८ आरक्षण खिडक्या, ३ व्हीलचेअर, ४ एटीएम अशा सुविधा स्थानकात आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बॉटल क्रश मशीनही स्थानकात उपलब्ध असून लवकरच स्थानकात बायो टॉयलेट आणि वेटिंग रूम उभारण्यात येणार आहे. (समाप्त)
असा झाला प्रवास
१९२६ : साल्सेट - ट्रॉम्बे रेल्वे मार्ग अशी ओळख अंधेरी स्थानकाची होती.
१९३४ : अंधेरधीरीवरून अंधेरी हे नाव स्थानकाला मिळाले.
१९०२ : स्थानकाची पहिली इमारत बांधण्यात आली.
२०१५ : जीर्ण होऊन मोडकळीस आलेली पहिली इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात आली.
२०१६ : मेट्रो मार्गातील सगळ्यात वर्दळीचे स्थानक अशी ओळख निर्माण