अंधेरी रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:33+5:302021-06-29T04:06:33+5:30
इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) भारतभरातील अनेक रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करीत आहे. त्यामध्ये अंधेरी स्थानकाचा समावेश आहे. ...
इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) भारतभरातील अनेक रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करीत आहे. त्यामध्ये अंधेरी स्थानकाचा समावेश आहे. स्थानकांच्या पुनर्विकासाचे उद्दिष्ट प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविणे आणि प्रवासाचा अनुभव देणे हे आहे. हे २१ हजार ८४३ चौरस मीटरमध्ये तयार केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेशन आणि ट्रान्सफर) मॉडेलचा अवलंब करण्यात आला आहे. त्याचे पुनर्विकास मॉडेल सक्षम प्राधिकरणास मंजुरीसाठी पाठविले आहे. पुन्हा आवश्यक असल्यास अंधेरी रेल्वेस्थनकाच्या पहिल्या टप्प्यातील विकासासाठी आरएफक्यू (पात्रतेसाठी विनंती) जारी केले जातील. फ्लोर प्लॅनच्या अतिरिक्त मंजुरीसह अंधेरी स्थानकाचा मास्टर प्लॅन २१ मे २०२१ रोजी पश्चिम रेल्वेकडून प्राप्त झाला आहे.
येत्या काळात मुंबईतील अंधेरी स्थानकाशिवाय आम्ही दादर, कल्याण, ठाकूरली, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे आणि बोरिवली स्थानकांचा पुनर्विकास करू. या प्रकल्पांमधील काम वेगवेगळ्या टप्प्यात केले जातील.
एस. के. लोहिया, एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी