आता गर्दीतही ओळखता येणार गुन्हेगारांचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 06:33 AM2020-02-22T06:33:32+5:302020-02-22T06:34:00+5:30

रेल्वे स्थानकांवर लवकरच ओळख पटविणारी यंत्रणा; फरार आरोपींसह हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे होणार सोपे

The face of criminals can now be identified in the crowd | आता गर्दीतही ओळखता येणार गुन्हेगारांचा चेहरा

आता गर्दीतही ओळखता येणार गुन्हेगारांचा चेहरा

googlenewsNext

मुंबई : बंगळुरू, भुसावळ आणि मनमाड स्थानकांनंतर मुंबईत चेहऱ्याची ओळख पटविणारी यंत्रणा (फेशिअल रेकॉगनिएशन सिस्टीम) बसविण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाईल. या यंत्रणेमुळे हरविलेली व्यक्ती, फरार आरोपींचा शोध घेणे सोपे होईल. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज ४६ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान रोजच वेगवेगळे गुन्हे घडतात. सध्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण ३ हजार १४० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. आता या सीसीटीव्ही कॅमेºयांमध्ये फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश करून नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्याद्वारे या कॅमेºयांमध्ये होणाºया रेकॉर्डिंगचा वापर चेहरे ओळखण्यासाठी केला जाईल.

असे होईल काम
चेहºयाची ओळख पटविणाºया यंत्रणेची सर्व कामे नियंत्रण कक्षातून केली जातील. या यंत्रणेत संबंधित व्यक्तीचा फोटो अपलोड केल्यावर, ती व्यक्ती कोणत्या दिवशी कोणत्या स्थानकावर होती, याची इत्थंभूत माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळेल. सीसीटीव्ही कॅमेºयाद्वारे ३० ते ४० मीटर अंतरावरील सर्व चेहरे स्कॅन केले जातील. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयाच्या नोंदी ठेवल्या जातील.


प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू
सुरक्षेला अधिक बळकटी येण्यासाठी चेहरा ओळखणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. यासह घाटकोपर स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेता गर्दीच्या नियोजनासाठी येथे विशेष पथक तयार केले आहे.
- अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे.

Web Title: The face of criminals can now be identified in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.