मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:31+5:302021-06-29T04:06:31+5:30
मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकात विविध सोयीसुविधा केल्या जाणार असून, येत्या काही दिवसात या स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंडियन ...
मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकात विविध सोयीसुविधा केल्या जाणार असून, येत्या काही दिवसात या स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आयआरएसडीसी अंधेरी रेल्वे स्टेशन टप्प्याटप्प्याने विकसित करणार आहे. यामध्ये एकूण ४.३११ एकर क्षेत्र आहे. पहिल्या टप्प्यात २.१ एकर आणि दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित क्षेत्रावर काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुनर्विकासासाठी २१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भारतभरातील अनेक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करीत आहे. त्यामध्ये अंधेरी स्थानकाचा समावेश आहे. स्थानकांच्या पुनर्विकासाचे उद्दिष्ट प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविणे आणि प्रवासाचा अनुभव देणे हे आहे. हे २१ हजार ८४३ चौरस मीटरमध्ये तयार केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी डीबीएफओटी (डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेशन आणि ट्रान्सफर) मॉडेलचा अवलंब करण्यात आला आहे. त्याचे पुनर्विकास मॉडेल सक्षम प्राधिकरणास मंजुरीसाठी पाठविले आहे.
अंधेरी स्थानकाच्या पूर्वेकडील भागात जे सर्व उड्डाणपूल आणि मेट्रो स्थानकांना रेल्वे स्थानकांसह जोडले जाणार आहे. वर्सोवा मार्ग रोडवर प्रवेश, ड्रॉप-ऑफ/पिकअपची योजना आखण्यात आली आहे. त्याच वेळी स्थानकाचे पादचारी पूल आणि स्वामी नित्यानंद मार्ग जोडले जाणार आहे. याशिवाय अशी छप्पर बनवण्याचेही नियोजन आहे. चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकासारख्या उपनगरी स्थानकांवर पावसाचे पाणी आणि प्लॅटफॉर्ममध्ये थेट सूर्यप्रकाश आहे. स्थानक ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर विकसित केले जाईल. सीसीटीव्हीसह इतर उपकरणांसह आधुनिक बांधकाम व्यवस्थापन प्रणालीसह हे एक स्मार्ट स्टेशन म्हणून पुनर्विकास केले जात आहे. येथील व्यावसायिक विकास आराखडा कॉन्कोर्सस्तरावरही तयार करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतील.
पश्चिम रेल्वेचे अंधेरी स्थानक दोन प्रमुख रेल्वेमार्गाची सेवा देते. यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा पनवेलकडे जाणारा हार्बर मार्ग आहे. त्याच वेळी, चर्चगेट आणि डहाणू पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणारे आहेत. तसेच व्हर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाईन स्टेशनच्या पूर्वेस आहे. अंधेरी हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एक प्रमुख स्थानक आहे. दररोज सुमारे ४.२ लाख प्रवासी प्रवास करतात.
येत्या काळात मुंबईतील अंधेरी स्थानकाशिवाय आम्ही दादर, कल्याण, ठाकूरली, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे आणि बोरिवली स्थानकांचा पुनर्विकास करू. या प्रकल्पांमधील काम वेगवेगळ्या टप्प्यात केले जाईल.
एस के लोहिया, एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी