- कुलदीप घायवट।मुंबई : दस-याच्या तोंडावर फुलबाजार विविधरंगी फुलांनी फुलला असून, देशी-विदेशी फुलांची आवक वाढली आहे. आपट्याची पाने, तोरणे, हार यांचीही खरेदी जोरात सुरू आहे.दादर, परळ, प्रभादेवी, गिरगाव उपनगरे व ठाणे, नवी मुंबईतील बाजारपेठांवर फुलांचे साम्राज्य आहे. यंदा फुलांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांनी हातगाड्या, टोपल्या, दुकाने भरली आहेत.झेंडूचा दर ५० ते ७० रुपये किलो आहे. उद्या हा दर ८० ते १०० रुपयांपर्यंत जाईल. शेवंती २०० ते २५० रुपये किलो, मोगरा ८०० रुपये किलो, अबोली ४०० किलो, शेवंतीची वेणी २०० ते २५० रुपये डझन भावाने विकली जात आहे.कमळ, गुलाब, तेरडा, चाफा, सोनटक्का, जास्वंद यांच्या किमती १० ते १५ रुपये प्रतिवाटा आहे. दूर्वा, तुळस, बेल पान, आंब्याचे पान, कडुलिंब, केळीचे पान यांची किंमत जुडीनुसार आहे. पुणे, नगर, वसई, नाशिक येथून फुले नवी मुंबई व मुंबईत येतात. घाऊक व किरकोळ किमतीत१० ते ३० टक्के फरक आहे. आपट्याचीजुडी १० ते २० रुपये आहे. फुलांच्या पुरवठ्यावर व दर्जानुसार त्यांची किंमतठरते, असे फुलांचे विक्रेते मधुकर सोनावणे यांनी सांगितले.झेंडूचे पिवळा व नारंगी असे दोन प्रकार पाहायला मिळत आहेत. परंतु यामधील पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची मागणी जास्त आहे. त्यामुळे पिवळ्या झेंडूची किंमत जास्त आहे. त्यासाठी किलोमागे जादा १० रुपये मोजावे लागतात.- प्रवीण खारवीर, फुलविक्रेता
दस-याच्या तोंडावर फुलबाजार विविधरंगी फुलांनी फुलला, देशी-विदेशी फुलांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 6:10 AM