रविवारी सकाळीच फेसबूक झाले ठप्प, जगभरातील युझर्स त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 10:47 AM2018-11-18T10:47:51+5:302018-11-18T11:36:34+5:30

सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूकची सेवा रविवारी सकाळपासून ठप्प झाली.

Facebook down in Sunday morning, suffering worldwide users | रविवारी सकाळीच फेसबूक झाले ठप्प, जगभरातील युझर्स त्रस्त

रविवारी सकाळीच फेसबूक झाले ठप्प, जगभरातील युझर्स त्रस्त

Next
ठळक मुद्देलोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबूकची सेवा रविवारी सकाळपासून ठप्प झालीभारताबरोबरच जगभरात फेसबूकची सेवा बंद झाली असल्याने कोट्यवधी युझर्स त्रस्तभारतीय वेळेनुसार सकाळी 10.50 च्या सुमारास फेसबूकची सेवा पुन्हा सुरू

मुंबई - लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबूकची सेवा रविवारी सकाळपासून ठप्प झाली. भारताबरोबरच जगभरात फेसबूकची सेवा बंद झाली असल्याने कोट्यवधी युझर्स त्रस्त झाले . फेसबूक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर युझर्सना स्वत:ची प्रोफाइल दिसत होता मात्र न्यूज फिड बंद असल्याने इतरांच्या पोस्ट, फोटो दिसत नव्हते.  मात्र फेसबूकवर स्टेटस, तसेच फोटो अपलोड होत होते. दरम्यान, फेसबूक डाऊन झाल्यानंतर युझर्सनी ट्विटर तसेच अन्य सोशल मीडिया साइट्सवरून आपली तक्रार देण्यास सुरुवात केली.  अखेरीस भारतीय वेळेनुसार सकाळी 10.50 च्या सुमारास फेसबूकची सेवा पुन्हा सुरू झाली.

रविवारी सकाळपासूनच अनेक युझर्सचे फेसबूकवरील न्यूजफि़ड पेज अपडेट होत नव्हते. तसेच डेक्सटॉपवर एरर मेसेज दिसत होता. फेसबूकवर लॉग इन केल्यावर समथिंग वेंट रॉग Something went wrong  आणि Try Refreshing This Page असा मेसेज दिसत होता. 
 केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून फेसबूकची सेवा ठप्प झाल्याचे मेसेज येत होते. दरम्यान, भारतीय वेळेनुसार सकाळी 10.50 नंतर फेसबूकची सेवा पूर्ववत सुरू झाली. 

Web Title: Facebook down in Sunday morning, suffering worldwide users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.