Join us

पालिकेच्या अर्ज नमुन्यांचे सुलभीकरण

By admin | Published: August 18, 2015 2:14 AM

श्वान पाळण्यासाठी महापलिकेची परवानगी मिळवणे आता अधिक सोपे व सहज होणार आहे. पाळीव श्वानासाठी बंधनकारक असलेले

आरोग्य खात्याचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्धमुंबई : श्वान पाळण्यासाठी महापलिकेची परवानगी मिळवणे आता अधिक सोपे व सहज होणार आहे. पाळीव श्वानासाठी बंधनकारक असलेले अनुज्ञापत्र मिळविण्यासाठी करावयाच्या अर्जाचा मसुदा सुस्पष्ट व सोपा करण्यात आला आहे.आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार नागरी सेवा-सुविधांशी संबंधित विविध अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यात सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अर्जांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाळीव श्वानासाठीच्या अर्ज नमुन्यात यापूर्वी श्वान कुठून आणला अथवा विकत घेतला, श्वान मुंबईबाहेरून आणला आहे किंवा नाही, या प्रकारची महिती देणे आवश्यक होते. मात्र आता नवीन अर्ज मसुद्यामध्ये श्वान मालकाचे नाव, पत्ता यासह श्वानाचा संक्षिप्त तपशील, रॅबिज लसीकरणाच्या प्रमाणपत्रासह संबंधित तपशील नमूद करणे बंधनकारक असल्याचे सुचविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)