महापालिकेच्या अर्ज नमुन्यांचे सुलभीकरण
By admin | Published: August 17, 2015 10:38 PM2015-08-17T22:38:27+5:302015-08-17T22:38:27+5:30
महापालिकेच्या अर्ज नमुन्यांचे सुलभीकरण
Next
म ापालिकेच्या अर्ज नमुन्यांचे सुलभीकरणसार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित अर्जांचे मसुदे संकेतस्थळावर उपलब्धलोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने सकारात्मक पाऊलमुंबई : श्वान पाळण्यासाठी महापलिकेची परवानगी प्राप्त करणे आता अधिक सोपे व सहज होण्याची शक्यता आहे. पाळीव श्वानासाठी बंधनकारक असणारे पालिकेचे अनुज्ञापत्र मिळविण्यासाठी करावयाच्या अर्जाचा मसुदा अत्यंत सुस्पष्ट व सोपा करण्यात आला असून, पूर्वीच्या नमुन्यातील किचकट भाग वगळण्यात आला आहे.आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार नागरी सेवा सुविधांशी संबंधित विविध अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यात सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अर्जांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार पाळीव श्वानासाठी बंधनकारक असणार्या अनुज्ञापत्रासाठीच्या अर्ज नमुन्यात यापूर्वी श्वान कुठुन आणला अथवा विकत घेतला, श्वान मुंबईबाहेरुन आणला आहे किंवा नाही, याप्रकारची महिती देणे आवश्यक होते. मात्र आता नवीन अर्ज मसुद्यामध्ये श्वान मालकाचे नाव, पत्ता यासह श्वानाचा संक्षिप्त तपशिल, रॅबिज लसीकरणाच्या प्रमाणपत्रासह संबंधित तपशिल नमूद करणे बंधनकारक असल्याचे सुचविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)...........................सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित असणार्या एकूण ७ अर्जांपैकी २ अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. यामध्ये श्वान अनुज्ञापत्र अर्ज व आरोग्य अनुज्ञापत्र प्राप्त करावयाच्या अर्ज मसुद्यांचा समावेश आहे. हे सर्व अर्ज मसुदे/नमुने मराठी व इंग्रजी भाषेत पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत............................