Join us

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवीन दिशा-निर्देश फलक व चिन्हांची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:06 AM

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अलीकडेच प्लॅटफॉर्म क्रमांक चिन्हांचे आणि दिशा-निर्देश बोर्ड उपलब्ध ...

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अलीकडेच प्लॅटफॉर्म क्रमांक चिन्हांचे आणि दिशा-निर्देश बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक दर्शविणारे मोठे फॉन्ट आहेत, ज्यामुळे प्रवाशांना सहजपणे लांब अंतरावरून प्लॅटफॉर्म समजू शकतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वांत व्यस्त स्थानकांपैकी एक आहे जिथून दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून ये-जा करतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी झोनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ७ आहेत आणि तीन दिशा-निर्देश बोर्ड आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ ते १८ प्लॅटफॉर्म येथे २ दिशा-निर्देश बोर्ड देण्यात आले आहेत. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांचा कोणालाही सहजपणे वापर करता येतो. याशिवाय स्टेशनवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, एस्केलेटर, बॅगेज सॅनिटायझर मशीन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.