मुंबई : फोर्ट परिसरातील भानुशाली या इमारतीचा काही भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच इमारत दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना १ जून २०१९ रोजी महापालिकेमार्फत देण्यात आला होता, अशी माहिती म्हाडाने दिली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या दुर्घटनेचा वस्तुस्थिती अहवाल तयार केला आहे.मंडळातर्फे दुर्घटनाग्रस्त इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरात मागणीनुसार जागा उपलब्ध करून देण्यात येईल. म्हाडाकडील माहितीनुसार, इमारत १०० वर्षे जुनी होती. दुरुस्तीची आवश्यकता असल्याने मालक, रहिवाशांच्या मागणीनुसार इमारतीतील सहा भाडेकरू, रहिवाशांना इमारत दुरुस्तीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र (विनापरताव्यासह) देण्यात आले होते. या तरतुदीनुसार मालक आणि भाडेकरू स्वखर्चाने इमारतीची दुरुस्ती करू शकतात. ना-हरकत प्रमाणपत्रासोबत म्हाडाने रहिवाशांच्या सुरक्षेबाबतचे हमीपत्रही घेतले होते.मृतांचा आकडा १०- फोर्ट येथील भानुशाली या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा शुक्रवारी सायंकाळी १० झाला आहे. कुसुम पद्मलाल गुप्ता (४५), ज्योत्स्ना पद्मलाल गुप्ता (७०), पद्मलाल मेवालाल गुप्ता (५०), मनिबेन नानजी फारिया (६५), शैलेश भालचंद्र कानडू (१७), ललित चौरासिया (३५), रिंकू चौरासिया (२५), कल्पेश फारिया (३२) अशी ८ मृतांची नावे असून, दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर नेहा गुप्ता आणि भालचंद्र कानडू असे दोघे जखमी झाले. यातील भालचंद्र किरकोळ जखमी झाले असून नेहा यांची प्रकृती चिंताजनक आहे.- भानुशाली या तळमजला अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीच्या एका बाजूचा भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते. ८ फायर इंजीन, २ रेस्क्यू व्हॅनच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. याव्यतिरिक्त ५० कामगार, ६ जेसीबी, १० डंपर्स घटनास्थळी कार्यरत होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.- दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वीच २ जण सुखरूप बाहेर पडले होते. अग्निशमन दलाने इमारतीच्या दुसऱ्या भागात अडकलेल्या १३ जणांना सुखरूप बाहेर काढले. तर ढिगाºयातून ९ जणांना बाहेर काढण्यात आले. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवार सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असतानाच सकाळी मृतांचा आकडा ६ झाला. दुपारी हा आकडा ९ झाला. दुपारी साडेचार वाजेपर्यंत मृतांचा आकडा १० वर पोहोचला. तोपर्यंत येथील बचावकार्य सुरू होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.- मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून एकूण २७ जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.- ना-हरकत प्रमाणपत्र देतेवेळी इमारतीत एकूण २७ निवासी व ३१ अनिवासी गाळे होते. त्यानंतर पालिकेने इमारत दुरुस्तीसाठी आयओडी व सीसी जून २०१९ मध्ये प्राप्त केली. ना-हरकत प्रमाणपत्रधारकांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आयओडी, नकाशे पालिकेने २ जून २०१८ रोजीच दिले होते. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा परवानाही १ जून २०१९ रोजी दिला होता.असे सुरू झाले मदत व बचावकार्यभानुशाली इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते. ८ फायर इंजीन, २ रेस्क्यू व्हॅनच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. याव्यतिरिक्त ५० कामगार, ६ जेसीबी, १० डंपर्स घटनास्थळी कार्यरत होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वीच २ जण सुखरूप बाहेर पडले होते. अग्निशमन दलाने इमारतीच्या दुसºया भागात अडकलेल्या १३ जणांना सुखरूप बाहेर काढले. तर ढिगाºयातून ९ जणांना बाहेर काढण्यात आले. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला होता.शुक्रवार सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असतानाच सकाळी मृतांचा आकडा ६ झाला. दुपारी हा आकडा ९ झाला. दुपारी साडेचार वाजेपर्यंत मृतांचा आकडा १० वर पोहोचला. तोपर्यंत येथील बचावकार्य सुरू होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून एकूण २७ जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भानुशाली इमारत दुर्घटनाप्रकरणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून वस्तुस्थिती अहवाल तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:33 AM