"फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महामंडळाकडे दुर्लक्ष केलं अन् आता फक्त राजकीय स्टंटबाजी करतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 08:42 PM2020-06-27T20:42:47+5:302020-06-27T22:13:05+5:30

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण पगार देण्याचे निवेदन अनिल परब यांना दिले. 

"Fadnavis ignored the ST corporation when he was the chief minister and now he is only doing political stunts" | "फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महामंडळाकडे दुर्लक्ष केलं अन् आता फक्त राजकीय स्टंटबाजी करतायेत"

"फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महामंडळाकडे दुर्लक्ष केलं अन् आता फक्त राजकीय स्टंटबाजी करतायेत"

Next
ठळक मुद्दे एसटी कर्मचा-यांचे वेतनवाढीकरीता झालेल्या संपाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही.एसटी महामंडळाने एसटी कामगारांना मे महिन्याचे वेतन ५० टक्केच देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन संप झाले. एसटी कर्मचा-यांचे वेतनवाढीकरीता झालेल्या संपाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही. मात्र, आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण पगार देण्याचे निवेदन अनिल परब यांना दिले. 

या निवेदनामुळे एसटी कामगार संघटनेच्या डोक्यात एक तीव्र सणक गेली आहे. हा एक फक्त राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया संघटनांनी दिली. एसटी महामंडळाने एसटी कामगारांना मे महिन्याचे वेतन ५० टक्केच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटना आधीच संतापल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून संपूर्ण वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र, फडणवीसांची ही मागणी फक्त राजकीय स्टंट असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.

एसटी कामगारांना पूर्ण वेतन मिळावे, ही भूमिका सर्व संघटनांची आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एसटी महामंडळाकडे विषेश लक्ष देणे गरजेचे होते. आता विरोधी पक्षात असताना विरोधाला विरोधाचे राजकारण न करता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला विशेष आर्थिक पॅकेज मिळवून द्यावे. जेणेकरून मे महिन्यासह त्यापुढील सहा महिन्याचे वेतन एसटी महामंडळाला देता येईल, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात डिसेंबर २०१५,  ऑक्टोबर २०१७, जून २०१८ असे तीन संप झाले. एसटी कर्मचा-यांचे वेतनवाढीकरीता झालेल्या संपाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री यांनी वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही. याउलट मागील चार वर्षात महामंडळाच्या पैशांची उधळपट्टी होत असताना परिवहन खात्यात कोणताही हस्तक्षेप केला नाही. एसटी महामंडळाचा संचित तोटा देखील फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये झाला. महापुराच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांना कोणतेही साहाय्य करण्यात आले नाही. 
- मुकेश तिगोटे,  सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण वेतन मिळण्यासाठी आमची संघटना आग्रही आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी हि राजकीय स्टंटबाजी आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना कोणतीही एसटीसाठी कोणतही ठोस धोरण राबविले नाही. 
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

आणखी बातम्या...

ठाण्यात सोमवारपासून लॉकडाऊन? लवकरच जाहीर करणार हॉटस्पॉटची ठिकाणे

शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार

"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर 

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! रुग्णांची संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

Web Title: "Fadnavis ignored the ST corporation when he was the chief minister and now he is only doing political stunts"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.