Join us

मुंबईच्या चौफेर विकासाला फडणवीस, गडकरींची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:34 AM

झोपडपट्टीमुक्त मुंबईसह शहराच्या चौफेर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी या दोन नागपूरकर नेत्यांनी शनिवारी आपले मुंबईशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगत झोपडपट्टीमुक्त मुंबईसह शहराच्या चौफेर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही दिली.राज्य शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुंबई २.०’ या परिषदेचे उद्घाटन फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले.मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी अनेक जण मुंबईला शांघाय करण्याचे बोलत होते. पण मुंबई ही मुंबई आहे. तिचे एक वेगळे कल्चर, स्पिरीट आहे. मुंबईचा एक वेगळा फ्लेवर आहे. हा फ्लेवर टिकवून ठेवून त्याला आणखी अ‍ॅक्सेसेबल करण्याचे काम करीत आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत; मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झालेली नाहीत. अशा लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन/मिशन आहे. मुंबईमध्ये १० लाख परवडणारी घरे उभारण्यात येतील. मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो अंतिम करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.यावेळी अभिनेता शाहरुख खानने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. ‘मी २० वर्षांपासून मुंबईकर झालोय. मुंबईत क्षमता आहे. मुंबई ही ग्लोबल सिटी असून इथे ४५ टक्के जनता झोपडपट्टीत राहते, शहराला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे, त्यामुळे पदावर आल्यानंतर प्रथम मुंबईतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे, असे मुख्यमंत्री मुलाखतीत म्हणाले.या परिषदेत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, प्राईस वॉटरहाऊस कॉपर्सचे प्रमुख हजिम गलाल, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह उद्योग जगतातील प्रमुख, कार्यकारी अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, विविध विकास कामे, भविष्यातील मुंबई याबद्दल या परिषदेतील विविध परिसंवादात चर्चा झाली.शाहरुख करणार शिक्षण क्षेत्रात कामयावेळी शाहरूख खान यांनी आपण स्वत: शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले. मुंबईतील जुन्या वस्तू, ठिकाणे, संस्कृती जपून ठेवण्यासाठी संग्रहालय उभारण्यासाठी मी पुढाकार घेईन. येथील सांस्कृतिक, कला, नेपथ्य आदींसह सर्व क्षेत्रातील कल्पक व्यक्तींना घेऊन मुंबईला ‘क्रिएटिव्ह हब’ बनवू, असे शाहरूख म्हणाला. मुख्यमंत्री करीत असलेल्या विकास कामांची त्याने मुक्तकंठाने प्रशंसा केली.> मुंबई-दिल्ली १२ पदरी महामार्गसिडकोने सहकार्य केल्यास जेएनपीटी भागात नवीन शहर वसविण्यासाठी सहकार्य करू. तसेच मुंबईत गरीब रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार, असे सांगून गडकरी यांनी मुंबई- दिल्ली मार्गावरील वाहतुकीचा वेळ वाचावा यासाठी मुंबई ते दिल्ली हा १२ पदरी महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.>मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी : गडकरीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार, त्यामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यास व प्रदूषण कमी होईल. तसेच लवकरच मुंबई, नवी मुंबई, कोची व पुणे येथे इथेनॉलवर चालणाऱ्या बस सुरू करण्यात येणार आहेत, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले.मुंबईशी माझे वेगळे नाते आहे. राज्यात मंत्री असताना मी इथे अनेक कामे केली. आता मुख्यमंत्री फडणवीस त्यापुढे जाऊन अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करत आहेत. मुुंबई पोर्ट ट्रस्टकडे मोठी जागा आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू करण्यात येत आहे. क्रूझ वाहतूक सुरू झाली आहे.

टॅग्स :नितीन गडकरीदेवेंद्र फडणवीस