फडणवीसांचा तिसऱ्यांदा गडचिरोलीत मुक्काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:43 AM2024-02-05T06:43:30+5:302024-02-05T06:43:53+5:30

गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी ठाम

Fadnavis stay in Gadchiroli for the third time! | फडणवीसांचा तिसऱ्यांदा गडचिरोलीत मुक्काम!

फडणवीसांचा तिसऱ्यांदा गडचिरोलीत मुक्काम!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, गेल्या १६ महिन्यांत सातवेळा या जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला. सरकार पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला.
गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी विकासाच्या विविध योजनांना या जिल्ह्यात गती दिली आहे. नक्षलवादाला विकासाचा पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने ते पावले उचलत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकदा आणि उपमुख्यमंत्री म्हणून दोनवेळा त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला.

१५ ऑगस्ट २०२३ला त्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन केले. तेव्हा पिंपळी बुर्गी येथे भेट देणारे ते राज्याच्या इतिहासातील पहिले गृहमंत्री किंवा राजकीय नेते ठरले होते. हा भाग इतका संवेदनशील की तेथे कोणतेही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजवर गेले नव्हते. दि. १ मे २०२३ महाराष्ट्रदिनी त्यांनी दमरंचा येथे पोलिस ठाण्याचे उद्घाटन केले होते. छत्तीसगड सीमेवर असलेल्या याचठिकाणी आदल्या दिवशी चकमक झाली होती. हाही अत्यंत संवेदनशील भाग समजला जातो.शनिवारी रात्री त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला. 
रविवारी सकाळी गडचिरोलीत सकाळपासून लागले कामाला, पहाटे ६.४५ ला मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविली. आता गडचिरोली सर्वार्थाने धावू लागली आहे, असे ते यावेळी म्हणाले. छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या वांगे पुरी येथील आदिवासीबांधवांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले.

 

Web Title: Fadnavis stay in Gadchiroli for the third time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.