ड्रायव्हिंग टेस्ट नापास...? नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! दाेन वर्षांत ५६ हजार चालकांनी मशीनवर केला सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:41 AM2023-12-19T09:41:50+5:302023-12-19T09:42:01+5:30

राज्यभरातील परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना हे सिम्युलेटर देण्यात आले आहेत.

Failed driving test...? Nae tension; Isn't it a simulator! In two years, 56 thousand drivers practiced on the machine | ड्रायव्हिंग टेस्ट नापास...? नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! दाेन वर्षांत ५६ हजार चालकांनी मशीनवर केला सराव

ड्रायव्हिंग टेस्ट नापास...? नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! दाेन वर्षांत ५६ हजार चालकांनी मशीनवर केला सराव

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टमध्ये नापास झालात तर चिंता करू नका, कारण अशा वाहन चालकांसाठी मुंबईत आरटीओ कार्यालयात ७ सिम्युलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन वर्षांत ५६ हजार चालकांनी या मशीनवर सराव केला आहे. यावरील सरावामुळे वाहन चाचणी चांगल्या प्रकारे दिल्याने चालकांच्या हाती स्टेअरिंग येणार आहे.

राज्यभरातील परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना हे सिम्युलेटर देण्यात आले आहेत. वाहन चालकांना वाहन चालविण्याचा परवाना काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परवानाधारकाकडे स्वतःचे वाहन नसते. मात्र, वाहन परवाना हवा असतो. काहीवेळा स्वतःचे वाहन असते, मात्र वेळ आणि पैसा खर्च करू शकत नाही. अशा प्रसंगात कार्यालयात बसून वाहन चालविण्याचा सराव करता येतो. त्यामुळे वेळ आणि तेल यांची बचत होते. याशिवाय भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो, शिकाऊ वाहन परवाना ज्याने घेतला आहे. 

परवाना जुना आहे...
ज्याचा परवाना आहे, पण जुना आहे तोही सराव करू शकतो. पूर्वी रस्त्यावर गाड्या कमी होत्या, पण आजच्या स्थितीला अनुसरून सिन सिम्युलेट केले आहेत, अशी माहिती परिवहन विभागाचे प्रवक्ता विनय अहिरे यांनी दिली.

ड्रायव्हिंग सिम्युलेटर असल्याने काही नवशिक्यांना गाडी चालवण्यासाठी सराव मिळू शकेल आणि त्याचा फायदा होईल. पण, रस्त्यावर गाडी चालवणे हे पण अतिशय महत्त्वाचे आहे. गाडी चालवणे ही कला कुठल्याही इतर कलेप्रमाणे सराव करूनच उत्तम होते. फक्त गाडीचा कंट्रोल हे महत्त्वाचे नसून सुरक्षितपणे गाडी चालवण्याची कला आणि मानसिकता कुठल्याही वाहन चालकामध्ये कशी निर्माण होईल यावर भर दिला गेला पाहिजे, नुसत्या सिम्युलेटरमुळे हे साध्य होणार नाही.
- रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

Web Title: Failed driving test...? Nae tension; Isn't it a simulator! In two years, 56 thousand drivers practiced on the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.